shirur-police-vehicle

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर पोलिस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन आवारात सन २००३ पासून जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहनाबाबत न्यायालयीन प्रक्रीया संबधीत वाहन मालकांनी पुर्ण न केल्याने व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस स्टेशनचे आवारात मालकांच्या प्रतीक्षेत तब्बल २० वर्षापासून धुळ खात पडून होती. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून पुढील कारवाईला त्यामुळे वेग आला आहे.

वाहनाचे ऊन व पावसामुळे तसेच अधिक कालावधी करीता एकाच ठिकाणी उभे राहून मोठे नुकसान होत होते. त्या वाहनांमुळे पोलिस ठाणे परीसरात सुटसुटीत काम करणे जिकीरीचे झाले होते. सदर वाहने खुप दिवसापासून शिरूर पोलिस ठाणे येथे पडून असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याबाबत पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी आदेश दिले होते.

वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गंगा माता वाहन शोध संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेत शिरूर पोलिस ठाणे आवारात असलेल्या एकूण ४०० हुन अधिक जप्त, बिनधणी व अपघात ग्रस्त वाहनांपैकी एकूण २२० वाहनांचे चेसी नंबर व इंजिन नंबर याच्या मदतीने मालकाचे नाव व पत्ता काढण्यात आलेले आहेत. वाहनाचे मालकांचे दिले पत्यावर त्यांना वाहन ताब्यात घेण्याकामी ८ दिवसाच्या आत येण्याबाबत कळविण्यात येणार आहे. वाहन मालक वाहन सोडविण्याकरीता पोलिस ठाणे येथे हजर न राहील्यास त्यांना वाहनामध्ये स्वारस्य नाही, असे समजून सदर वाहनाचा लिलाव करून येणारी रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कळविले आहे.

दरम्यान, शिरूर पोलिस ठाणे येथे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मालकांच्या ताब्यात मिळण्याचे काम आता सोईस्कर झाल्याने शिरूर परीसरातील लोंकाना त्यांचे रोजचे वापराकरीता वाहने मिळणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

वरील कार्यवाहीपोलिस अधीक्षक अंकित गोयल, मितेश गटटे अपर पोलिस अधिक्षक, यशवंत गवारी उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर यांच्या मागदर्शना खाली संजय जगताप पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस ठाणे व सर्व अधिकारी, पोहवा परशराम सांगळे, पोना बापू मांडगे, राजेंद्र वाघमोडे, बालु भदर, मपोको अर्चना यादव, शेखर झाडबुके, विरेंद्र सुबे व गंगा माता वाहन शोच संख्या, परंदवाडी (ता. मावळ जि. पुणे) यांचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे व भारत वाघ यांनी परीश्रम घेतले आहेत.

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

शिरूर पोलिसांची चरस व गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई…