शिरूर तालुका

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी शेतात घुसले. यामध्ये म्हसे येथील शेतकरी निळू चोरे, रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निळू चोरे यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असून कांदा शेतातच साठवला आहे. त्यात पाणी शिरले तसेच काढणी सुरू असलेल्या पिकातही पाणी घुसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई मिळावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रविवारी (ता. २३) सकाळी शेतात आल्यानंतर पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. परंतु, स्थळ पाहणी करण्यासाठी दुर्लक्ष केले गेले. जर लवकर लक्ष दिले असते तर नुकसान टाळता आले असते, असे निळू चोरे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, आमच्या कष्टावर पाणी फिरल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी साद शेतकऱ्यांकडून घातली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago