ashok-bhorde

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) उपविभागीय अधिकारी पुणे यांनी पाच तलाठ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या होत्या. त्याबाबत यापूर्वी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी उपोषणही केले होते. परंतु त्यावर अंतिम कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी पुणे स्नेहा किसवे-देवकाते अखेर नरमल्या आणि शिरुर तालुक्यातील पाच तलाठ्यांना पदभार काढुन घेत त्यांना तालुक्याबाहेर अकार्यकारी पदावर सेवावर्ग करण्यात आले.

 

शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी तलाठी सजेतील तलाठी सचिन काळेल यांची संजय गांधी योजना पुणे शहर येथे सेवावर्ग केली. टाकळी हाजी सजेतील तलाठी ज्ञानेश्वर चौधरी यांची तहसिल पुणे शहर येथे सेवावर्ग केली. करडे सजेतील तलाठी आर पी जाधव यांची उपविभागीय अधिकारी पुणे येथील कार्यालयात सेवा वर्ग केली. कोरेगाव भिमा सजेतील तलाठी विशाल काळे यांची उपविभागीय अधिकारी पुणे कार्यालयात सेवावर्ग केली. याबाबतचे लेखी पत्र आज दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी सुट्टी असतानाही उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी काढले.

 

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आत्मदहन आंदोलनाच्या पवित्र्यामुळे उपविभागीय अधिकारी पुणे यांनी नरमाईची भुमिका घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी शिरुर तालुक्यातील तलाठ्यांच्या सजेचा पदभार काढुन घेत तालुक्याच्या बाहेर सेवावर्ग केल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असुन यानंतर महसूल मधील कोणता मासा भोरडे यांच्या गळाला लागणार…? याची शिरुर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा चालु असुन राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन भोरडे यांनी शिरुर तसेच पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात आगळेवेगळे स्वच्छता अभियान राबवले असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्यावर सर्वसामान्य लोकांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..