सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी सन 2023 च्या मंडळ अधिकारी या पदावर जिल्हाधिकारी पुणे यांच्यामार्फत केलेल्या नियुक्ती व बदल्यामध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप भोरडे यांनी करत शासनाला लेखी पत्र दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्याने सोमवार (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोरडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका घेत अशोक भोरडे यांना संबंधित मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या बदल्याबाबत 45 दिवसात निर्णय घेऊन कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने अव्वल कारकून, सर्कल यांची मंडळ अधिकारी या कार्यकारी पदावरती बेकायदेशीरपणे नियुक्त्या केल्या होत्या. सदर मंडळ अधिकारी हे त्या पदावरती नियुक्ती करण्यासाठी पात्र नसतानाही त्यांच्या बेकायदेशीरपणे बदल्या व नियुक्या करण्यात आल्या होत्या. याबाबत अशोक भोरडे यांनी माहिती अधिकारात माहिती काढत जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाने नियमबाह्य पद्धतीने या बदल्या व नियुक्त्या केलेल्या आहेत. हे उघड केले आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेली चुक शासनाच्या निदर्शनास आणुन दिली.

 

तरीही पुणे जिल्हाधिकारी कार्यालय केलेल्या चुकीच्या व नियमबाह्य बदल्या रद्द करत नव्हते. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे 2 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले होते. परंतु तिथे नेमणूकीस असलेले बंडगार्डन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस शिपाई अशोक केदार यांनी वेळीच मध्यस्ती करत भोरडे यांना आत्मदहन करुन दिले नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत संबंधित महसूल अधिकारी यांच्याशी बैठक लावली.

 

सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार अजित कुऱ्हाडे, तहसीलदार जाधव यांनी भोरडे यांना लेखी पत्र देत नियमबाह्य केलेल्या बदल्याबाबत 45 दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले. तसेच भोरडे यांनी आत्मदहन आंदोलन थांबवावे अशी विनंती केली. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी महसूल शाखेच्या विनंतीला मान देत भोरडे यांनी आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थागित केले असुन जर 45 दिवसात कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..