शिरूर तालुका

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

वाघाळे : श्रीक्षेत्र वाघाळे (ता. शिरूर) येथून सालाबादप्रमाणे वाघेश्वर पायी दिंडी सोहळा कार्तिकी वारीसाठी आज (गुरुवार) भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाला. गावातील सर्व स्तरातील भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

आज सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यांच्या मंदिरात पूजा-अर्चा आणि गाथा-भजनाचा कार्यक्रम पार पडला. भक्तीभावाने सजलेल्या पालखीसोबत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीने गावातून मार्गक्रमण केले.

दिंडीला निरोप देण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये बबन भोसले, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ डफळ, विजय शेळके, तुकाराम भोसले, हिम्मत थोरात, भरत थोरात, अंकुश शेळके, बाळासाहेब थोरात, शामराव शेळके, देवराम थोरात, दौलत थोरात, अशोक थोरात, किसन गोरडे, अंकुश धायबर, बबन यशवंत, बाजीराव भोसले, नरशिंग घोलप, संपत थोरात, भीमराव थोरात आणि रावसाहेब थोरात आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी चौकात दिंडी थांबल्यावर मा. जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर आणि दत्तात्रेय पाचुंदकर यांनी पालखीचे दर्शन घेऊन दिंडीकरांना शुभेच्छा दिल्या. या पायी दिंडी सोहळ्यामुळे वाघाळे परिसरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल अनुभवायला मिळाला. “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” या घोषात दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी

शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

4 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

7 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

18 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

23 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

26 मिनिटे ago

‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची…

31 मिनिटे ago