वाघाळे : वाघाळे (ता. शिरूर) येथील वाघेश्वर दिंडी रविवारी (ता. २४) हनुमान मंदिर येथून सकाळी अकरा वाजता आळंदीकडे मार्गस्थ झाली. भक्तिमय वातावरणात गावातील पांडुरंग थोरात, संदीप धायबर, सखाराम शेळके, सूर्यकांत बढे, भीमराव थोरात यांनी चहा पान व नाष्टा दिला.
दिंडी प्रथाणासाठी वाघाळे गावातील माजी सरपंच पप्पशेठ भोसले, चेअरमन बबन भोसले, सूर्यकांत बढे, गिताराम भोसले, अमोल भोसले, अंकुश शेळके, बाळासाहेब थोरात, संदीप धायबर, संभाजी गोरडे, अमोल थोरात, रावसाहेब थोरात, लालचंद धरणे, आनंदराव सोनवणे, विजय पवार, बाळासाहेब गावडे, वैभव गावडे, सुरेश थोरात, भीमराव थोरात, पांडुरंग थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट थोरात व उपाध्यक्ष विठ्ठल घोलप यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.
वाघाळे येथून प्रथमच पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान…
एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!