शिरूर तालुका

श्री खंडोबा देवाच्या मूर्तींना सोमवती अमावस्येनिमित्त जलस्नान…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): पारोडी (ता. शिरुर) येथे भीमा नदी पात्रात श्री क्षेत्र ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या मूर्तीना सोमवती अमावस्येनिमित्त जलस्नान घालण्यात आले. यावेळी भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

ढोकसांगवी येथे पहाटे सव्वापाच वाजता श्री खंडोबा देवाची महापूजा व सामूहिक आरती खंडोबा देवाचे पुजारी शरद गुरव यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर श्रींची मूर्ती पालखीत विराजमान करुन पालखीचे वाजत गाजत पारोडीकडे (ता. शिरुर) प्रस्थान झाले. यावेळी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. पारोडीत सकाळी दहा वाजता श्रींच्या मूर्तीना पालखीतील सहभागी व्यक्तींच्या हस्ते भीमा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवाची आरती व तळीभंडार झाल्यानंतर पालखी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा ढोकसांगवी गावाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. यावेळी, ‘सदानंदाचा येळकोट,येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष करण्यात आला. पालखी मार्गावर या पालखीचे ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी स्वागत करत श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

यंदाच्या वर्षातील ही पहिलीच सोमवती अमावस्या असल्याने या पालखी सोहळ्यात शाळकरी मुलांसह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात भाविक व ग्रामस्थ अणवानी सहभागी होत असून, सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पालखीतील सहभागी तरुणासह भाविकांनी पायात मोजे घातल्याचे दिसून आले. दरम्यान,ही पालखी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावांत आल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोषात व उत्साहात स्वागत केले. त्यानंतर मंदिरात श्री खंडोबा देवाची सामूहिक आरती झाल्यानंतर तळीभंडार करण्यात आले.

शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…

शिरूर लोकसभेतील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; कारण…

माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत: शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुरमधील नामांकित महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होतेय लुट…

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

2 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago