शिरुरमधील नामांकित महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होतेय लुट…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील नामांकित चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे दिवसेंदिवस नवनवीन कारनामे समोर येत आहे. बोरा महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लुट केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे प्रकार करण्यासाठी संस्थेतील बड्या पदाधिका-याकडून दबाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून सक्तीने पार्कींगचे पैसे घेतले जात आहे. जे विद्यार्थी पार्कींगचे पैसे देणार नाहीत. त्यांना गेटच्या आतमध्ये वाहनासह प्रवेश दिला जात नसून, विद्यार्थ्यांना गेट समोर उन्हामध्ये वाहने लावावी लागत आहे. यामुळे महाविद्यालय सुटल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडी होते व छोटे मोठे अपघात घडत आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी निशुल्क पार्कींगची व्यवस्था करणे बंधनकारक असताना देखील विद्यार्थ्यांकडून पार्किंगसाठी पैसे उकळले जात असून, पावती दिली जात नाही. विद्यार्थ्यांकडून पार्कींगचे पैसे घेणे नियमबाह्य असल्याने पावतीची मागणी केल्यास व्हिजीटर म्हणून पावती दिली जात आहे. अशा प्रकारे नवनवीन फंडे वापरून विद्यार्थ्यांची लुट करण्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहे. यासाठी संस्थेतील बड्या अधिका-यांकडून दबाव असल्याने कर्मचारी हे प्रकार करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यावर शिक्षण विभागातील बडे अधिकारी गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

न्यायालय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन…
शिक्षण संस्था, महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पार्कींगचे सुविधा उपलब्ध करून देणे हे त्या संस्थेचे, महाविद्यालयाचे कर्तव्य असते. अनेक वेळा महाविद्यालय पार्कींगचे शुल्क आकारतात, अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारण्यात येऊ नयेत याबाबत न्यायालयाचे आदेश/सुचना असताना आणि विद्यापीठाचेही असे शुल्क आकारण्याबाबत परिपत्रक नसताना देखील बोरा महाविद्यालयाकडून शुल्क आकारले जात असून विद्यार्थ्यांची लुट केली जात आहे.

बोरा महाविद्यालयात पार्कींगची अशी सुरू आहे वसुली…
नियमानुसार विद्यार्थ्यांकडून पार्कींगचे शुल्क आकारणे चुकीचे असल्याने महाविद्यालयाने व्हिजीटर पास म्हणून पावती पुस्तक छापले आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पावती दिली जात नाही. विद्यार्थ्यांनी पावती मागितल्यावर त्यांना व्हिजीटर पास दिला जातो. या पावतीवर कुठेही शुल्काचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने पार्कींग शुल्क आकारले जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून नाव न छापण्याच्या अटींवर सांगण्यात येत आहे. एकप्रकारे विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारत नसून व्हिजीटर कडून आकारले जात असल्याचा बनाव केला जात आहे.

संस्था अध्यक्षासंह पाच जण अद्यापही फरार; राजकीय दबाव की लक्ष्मी दर्शन?

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

शिरुर; वाळू माफियांची महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट