dog-attack
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोन वर्षांच्या चिमुरडयासह १५ ते २० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र घबराट उडाली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी १५ ते २० जणांना चावा घेतला असून, सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे, असे शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी संगितले.
शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साई अमोल वाईकर (वय ६), जवेरिया नदीम काकर (वय ६), प्रिय हनिफ शेख (वय २), मानसी रमेश इरस्ने (वय १४), अलमस सादीक शेख, मंगेश सोन्याबापू घनवट, एजान नसीम राजे या सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेण्यात येऊन ससून रुग्णालय, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
शिरूर शहरातील होलारआळी, सय्यदबाबानगर, साईनगर परिसरात सोमवारी (ता. १५) सांयकाळच्या दरम्यान दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला. या भागात सायंकाळची वेळ असल्याने नळाला पाणी आल्याने महिला नळावर, तर या परिसरात असणारी लहान मुले रस्त्यांवर गल्लीमध्ये खेळत होती. रस्त्यांवर जाणारे नागरीक यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून हातावर, पायावर, मांडीला, कानाला, पाठीला चावा घेऊन जखमी केले. नंतर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले, तर सातजण शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल झाले, येथे त्यांना रेबीज लस देण्यात आली. कुत्रे पिसाळलेले असतील तर त्यासाठी वेगळी लस सुविधा शहर ग्रामीण रुग्णालयात नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुणालयात पाठवण्यात आले आहे
आम्हाला वाचवा; नागरीकांचे नगर परिषदेला आवाहन…
आजच्या या मोकाट कुत्र्यांमध्ये एका कुत्र्याला नागरिकांनी जायबंदी केले असून, एक कुत्रा शहरात मोकाट फिरत असल्याने नागरिकांनी सावध राहावे. नगरपरिषदेच्या वतीने पुन्हा एकदा या मोकाट कुत्र्यांविषयी कार्यवाही करणे गरजेचे आहे व शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांपासून वाचवावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट; चिमुकल्यावर हल्ला…
शिरुर तालुक्यात कुत्रा चावल्याने लहान मुलाचा दुर्देवी मृत्यु
शिरूर तालुक्यात जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्याने महिला गंभीर जखमी; गुन्हा दाखल…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…