nimgaon-mahalungi-school
शिक्रापूरः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत आणि म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगी येथे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून शासनाच्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या सहकार्याने निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध कार्यक्रमापैकी देशाच्या गौरवासाठी आणि सन्माना साठी गावात तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेच्या अगोदर भारत मातेचा जयघोष आणि वंदे मातरम तसेच जय जवान जय किसान चे नारे देण्यात आले. यावेळी विद्या विकास मंदिर शाळेतील मुलामुलींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर, विद्या विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांच्या शुभ हस्ते तिरंगा झेंडा दाखवून तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी मॅरेथॉन मध्ये आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थी आणि पहिल्या तीन विद्यार्थिनींना स्वातंत्र्याची अमृत महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मध्ये अनेक विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी शाळेचे रमेश जाधव यांनी सुद्धा तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पळण्याचा मोह न आवरल्याने ते सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पळण्याचा आनंद घेत होते. यावेळी रमेश करपे सर, प्रकाश धोत्रे सर, बेबी चव्हाण मॅडम, बाबुराव चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी केले तर तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांचे आभार निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले.
निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण
निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…
निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी
निमगाव म्हाळुंगीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उदघाटन
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…