निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे दिवाळी च्या निमित्ताने सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सैनिकांच्या घरी जाऊन सैनिकांच्या घराला फुलांचे तोरण बांधत, घरापुढे आकर्षक रांगोळी काढून दिवे लावण्यात आले. तसेच सैनिकांच्या कुटुंबियांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान यावेळी प्रत्येक सैनिकांच्या घरोघरी भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान अशा घोषणांचा नारा देण्यात आला. यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच सविता करपे, उपसरपंच तनुजा विधाटे, माजी उपसरपंच कविता चौधरी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, अश्विनी लांडगे, माजी सैनिक दत्तात्रय घोलप, उदयोजक विजय करपे, राहुल करपे, विनायक करपे, एकनाथ लांडगे, किरण काळे, योगेश करपे, महेश गोसावी, वामन गव्हाणे, विजय तागड, एकनाथ लांडगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.