निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” या उपक्रमा अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत निमगाव म्हाळुंगी येथील इंदिरा कॉलनी येथील अंगणवाडी सेवकांनी अंगणवाडीची स्वच्छता करुन वृक्षारोपण केले. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे ग्रामपंचायत सदस्य बापूसो काळे यांच्या वतीने अंगणवाडीच्या सुशोभीकरणासाठी झाडे भेट देण्यात आली.

 

यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच सविता करपे, कासारी गावचे गणपत काळकुटे, नवनाथ भुजबळ, अरविंद काळकुटे, विक्रम चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, विजय करपे, कैलास रणसिंग तसेच अंगणवाडी सेविका रंजना चव्हाण, पदमा चव्हाण, मीना कुटे, कुसुम रणसिंग, जनाबाई रणसिंग, चांगुणा शिंदे, शारदा गुंजाळ, सविता चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक अपेक्षा टाकळकर आणि प्रदीप करपे यांनी अंगणवाडी ची स्वच्छता केली.

 

याप्रसंगी सविता करपे, नवनाथ भुजबळ, बापूसो काळे, गणपत काळकुटे, विजय करपे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना चव्हाण, सूत्रसंचालन कुसुम रणसिंग तर आभार मीना कुटे यांनी व्यक्त केले.