शिरूर तालुका

शिरूर! श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड; जिद्द आणि कष्टांना यशाची जोड…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून कृषी अधिकारी पदाला गवसणी घालत तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

श्रद्धा यांच्या वडिलांचे, शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांचे लहान वयातच पितृछत्र हरपले होते. श्रद्धा यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांनी काबाडकष्ट करून आपल्या तीनही मुलींना उच्चशिक्षित केले. या संघर्षमय प्रवासातूनच श्रद्धा यांनी शिक्षणाची वाट निवडत बी.एस्सी. (अॅग्री) पदवी पूर्ण केली. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून कृषी अधिकारी पद मिळवले. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह तालुक्यातील बेट भागातील नेते सावित्राभाऊ थोरात यांचे चिरंजीव अक्षय थोरात यांच्याशी झाला आहे.

श्रद्धा जाधव यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. श्रद्धा जाधव यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या हेतूने अभ्यास करावा; माधुरी झेंडगे

केंदूरच्या विदयार्थांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी: दिपक साकोरे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

7 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

12 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago