केंदूरच्या विदयार्थांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी: दिपक साकोरे 

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील तरुण अधिकाधिक स्पर्धा परीक्षेत यशसंपादक करत असून केंदूरच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाची आतापासूनच तयारी करुन जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले पाहिजे, असे मत राज्य राखीव बल पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे यांनी व्यक्त केले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा यांची माहिती होण्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना राज्य राखीव बल पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे बोलत होते.

याप्रसंगी सहसचिव एस. एम. गवळी, आजीव सेवक ए. बी. सुळगेकर, पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, पंचायत समिती उपसभापती सविता पऱ्हाड, सरपंच अविनाश साकोरे, प्राचार्य अनिल साकोरे, शालेय समितीचे अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, विश्वास पऱ्हाड, माउली थिटे, तुकाराम सुक्रे, बाबुराव साकोरे, विठ्ठल ताथवडे, भाउसो थिटे, अशोक भोसुरे यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची आवड असेल तर ती जोपासा व त्यातून पदवी संपादन करा तसेच MPSC व UPSC साठी आत्तापासूनच वाचनाची आवड निर्माण करा असा सल्ला दिपक साकोरे यांनी दिला, तसेच माणूस हा गरिबीतून घडला जातो. त्यासाठी आत्तापासूनच नोकरी व व्यवसाय याकडे लक्ष केंद्रित करा असे देखील सांगितले.

दरम्यान शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत थिटे यांनी केले तर सोमनाथ पिचड यांनी आभार मानले.