शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच कोलमडली…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत आघाडी उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. यामुळे सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली आहेत.

लोकशाही क्रांती आघाडीने दोन दिवसांपूर्वीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, शिरूरचे लोकनेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनामुळे भाजपचेही महत्त्वाचे केंद्रबिंदू अनुपस्थित आहेत. या तीन प्रमुख शक्ती निवडणुकीत नसल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रकाश धारिवाल यांनी सांगितले की, ‘वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आमचा व्यवसाय सातपेक्षा अधिक राज्यांत विस्तारलेला असल्याने आता पूर्णवेळ लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत सहभागी होणे शक्य नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. समाजकारण हीच माझी ओळख आहे.’

प्रकाश धारिवाल यांच्या या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये निराशेची लाट उमटली. अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय शिरूरच्या हितासाठी पुन्हा विचारात घेण्याची विनंती केली आहे.

शिरूर शहर विकास आघाडी – प्रकाश धारिवाल (माघार)
लोकशाही क्रांती आघाडी – रवींद्र धनक (निवडणूक न लढवण्याचा निर्णय)
भाजप – लोकनेते बाबुराव पाचर्णे (निधन)

शिरुर; सोनेसांगवीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ ला खिंडार एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago