Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा शिरूर पोलीसांनी केवळ तीन दिवसांत यशस्वी तपास करून उलगडा केला आहे. आरोपीसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनाऱ्यावरही कारवाई केली आहे. तपासातील काटेकोरपणा आणि तांत्रिक विश्लेषणामुळे हा गुन्हा पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी अल्पावधीत उघड केला आहे.
टाकळी हाजी येथील होणेमळ्यातील सुशिला पाडुरंग घोडे या महिला निघोज येथे भाजीपाला विक्री करून स्कुटीवरून टाकळी हाजीकडे येत असताना, होणेमळ्याजवळ अज्ञाताने मोटरसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून निघोजकडे पोबारा केला होता. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर आरोपी सुनील रामदास कांदळकर (रा. अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याचा माग काढत त्याला पोलीसांनी गजाआड केले.
आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीचे सोने ज्या सोनाऱ्याला विकले होते त्या प्रसाद तारकचंद बेल्हेकर (रा. अळकुटी, ता. पारनेर) याच्यावरही चोरीचे सोने खरेदी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली असून, नागरिकांकडून टाकळी हाजी पोलिसांच्या चोख कामगिरीचे कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून दोघांवर हल्ला; लोखंडी गज व विटेचा वापर…
शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार
Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी
पुणे अहिल्यानगर महामार्गावर चाकूचा धाक दाखवून चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…