शिरूर तालुका

वाघाळे येथील लहू थोरात यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड!

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील लहू बाळासो थोरात यांची शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाय, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांच्या अध्यक्षखाली मंगळवारी (ता. १८) सोसायटीची बैठक पार पडली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, आजी-माजी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने घेतलेला ठराव व ग्रामस्थांनी एकमताने लहू थोरात यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी त्यांनी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आल्यानंतर सत्कार करण्यात आला. दरम्यान, गावाने एकमताने निवड केल्याबद्दल लहू थोरात यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले आहेत.

शिरूर तालुक्यात वाघाळे गावामधील राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गावामध्ये सत्ताधारी व विरोधी पार्टी असली तरी विकासाच्या मुद्द्यावरून संपूर्ण गाव एक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वाघाळे गावातील राजकारण लक्षात घेता सर्वानुमते लहू थोरात यांची एकमताने निवड झाल्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनाही सुखद धक्का बसला आहे. वाघाळे गावाने एक आदर्श घालून दिल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.

‘वाघाळे गावातील नागरिकांनी राजकारण बाजूला ठेवत लहू थोरात यांची एकमताने निवड केली. वाघाळे गाव विकासासाठी एकवटल्याचे चित्र पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. भविष्यातही राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणार आहोत,’ असे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, लहू थोरात यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे शहरात नावलौकिक मिळवला आहे. पुणे शहरात वास्तव्यास असले तरी गावची नाळ त्यांनी तोडलेली नाही. गावच्या विकासासाठी ते कायम आघाडीवर असतात. शिवाय, गावाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago