waghale-krushi-pujan

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर तालुका

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय परिवाराच्या वतीने अक्षय तृतीया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील दाम्पत्यांच्या हस्ते शेती व भूमीचे पूजन करून कृषी हीच खरी अक्षय संपत्ती असल्याचा संदेश देण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या पुढाकाराने शेती व भूमीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक बैलगाडीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

व्यवसाय आणि नोकरी क्षणभंगुर असली तरी शेती अनादी काळापासून मानवाच्या जीवनाचा आधार राहिली आहे. देशातील ८० टक्के समाज कृषी संस्कृतीशी एकनिष्ठ असून हाच खरा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. पावसामुळे पीक येईल या विश्वासाने शेतकरी पेरणी करतो, ही उदाहरणे देत कृषी संस्कृतीतील विश्वासाचे महत्त्व याप्रसंगी विशद करण्यात आले.

अक्षय तृतीयेनिमित्त वाघाळे गावातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. फुला-पानांनी सजवलेली पारंपरिक बैलगाडी या यात्रेचे आकर्षण ठरली. भगवान योगेश्वरांच्या नामस्मरणात महिला, पुरुष, युवक व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर बांधावर जाऊन कृषी अवजारांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्रीसूक्तम्, नित्य पावन स्मरण स्तोत्र व नारायणोपनिषद् आदी स्तोत्रांचे सामूहिक पठण झाले.

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवा हा भगवद्गीतेचा सिद्धांत योगेश्वर कृषीच्या माध्यमातून वाघाळे गावात साकार होत आहे. हा केवळ शेतीचा नव्हे तर मानवी जीवन विकसित करणारा प्रयोग असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत