शिरूर तालुका

वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रेदरम्यान भव्य अशा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या शर्यतीमध्ये तब्बल ५०० बैलगाडे सहभाही झाले होते. शिवाय, यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातील हजारो नेटिझन्सनी आनंद घेतला आहे, अशी माहिती गावचे माजी सरपंच आणि आयोजक पप्पू भोसले यांनी www.shirurtaluka.com ला दिली.

वाघाळे येथे कालिकामातेचा उत्सव मंगळवारी (ता. २८) आणि बुधवारी (ता. १) मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गावचे माजी सरपंच पप्पू भोसले यांनी पुढाकार घेऊन कमी वेळेत बैलगाडा शर्यतीचे नियोजन केले होते. बैलगाडा शर्यतीची माहिती सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर अनेकांनी नोंदणीस सुरवात झाली. शिरूर तालुक्यासह परिसरातील गावांमधून ५००हून अधिक बैलगाडा मालकांनी नोंद केली होती.

वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर प्रथमच बैलगाडा शर्यती पार पडल्या. कै. आबासाहेब गणपत थोरात यांच्या स्मरणार्थ दत्तात्रेय गणपत थोरात व खंडू गणपत थोरात यांनी खासगी जागेत बैलगाडा शर्यतीसाठी घाट तयार करून दिला होता. युवा उद्योजक अमोल भोसले यांनी बैलगाडा यु-ट्यूब लाईव्ह उपलब्ध करून दिले होते. यामुळे गावासह विविध ठिकाणांहून हजारो बैलगाडा शौकीनांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला आहे. एक नंबरच्या गाड्यास ७५००१, दोन नंबरच्या गाड्यास ६१००१, तीन नंबरच्या गाड्यास ३१००१, चार नंबरच्या गाड्यास ११००१ बक्षिस ठेवण्यात आले होते.

बैलगाड्यांची संख्या मोठी असल्यामुळे दोन दिवस शर्यती सुरू होत्या. यात्रेनिमित्त गावात आलेल्या पाहुण्यांबरोबरच ऑनलाईन शर्यती पाहण्याचा अनेकांनी आनंद लुटला आहे. बैलगाडा घाटाजवळ मोकळे मैदान असल्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी प्रशस्त अशी जागा उपलब्ध झाली होती. शिवाय, दोन दिवस बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या आहेत, असेही पप्पू भोसले यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले. बैलगाडा शर्यती पार पाडण्यासाठी माजी सरपंच पप्पू भोसले, उपसरपंच दादा सोनवणे, माजी चेअरमन बबन भोसले, माजी सरपंच बबन शेळके, माजी सरपंच संगीता थोरात, विकास सोसायटीचे संचालक सुर्यकात बढे (गुरुजी), संचालक वैभव गावडे, गजानन थोरात, दत्तू थोरात, खंडू थोरात, नागुशेठ थोरात, सोनू थोरात, मानसिक कारकुड, सागर धायबर, धिरज दडवते, स्वप्निल भोसले, अमोल भोसले यांनी मोठी मेहनत घेतली होती.

दोन हजार बैले अन् घोड्या…
बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ५०० गाडे म्हणजेच दोन हजार बैले आणि किमान दोनशे घोडे गावात आले होते. बैलांच्या वाहतूकीसाठी वाहनेसुद्धा मोठ्या प्रमाणात आली होती. पण, प्रशस्त जागा उपलब्ध झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शिवाय, रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी यात्रेदरम्यान सुरक्षेचे नियोजन केले होते.

बैल हरवले अन् सापडलेही…
बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन बैल मोकळ्या रानातून पळत गेल्यामुळे ते सापडले नाहीत. बैल हरवल्याची माहिती व्हॉट्सऍप ग्रुपवरून व्हायरल झाली. दुसऱया दिवशी दोन्ही बैल सुरक्षित मिळाल्यामुले बैल मालकाबरोबरच आयोजकांनाही मोठा आनंद झाला.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

6 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago