waghale yatra

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

शिरूर तालुका

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली.

वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनीताई स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मंगळवारी (ता. २८) आणि बुधवारी (ता. १) दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (ता. २८) सकाळी कालिकामाता देवीची महापूजा, पालखी काढण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा आणि बुधवारी (ता. १) सकाळी हजेरी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सांयकाळी चार वाजता कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यावेळी विविध ठिकाणांहून पैलवान गावात दाखल झाले होते. मुलीसुद्धा कुस्तीमध्ये सहभागी झाल्या होत्या. गावातील नागरिकांसह पाहुण्यांनी गाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद लुटला. सायंकाळी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. गावातील बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवून दिली होती, अशी माहिती सरपंच नलिनीताई थोरात यांनी दिली.

गावामध्ये यात्रेनिमित्त अनेक हॉटेलधारकांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध झाले होते. महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवस मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असेही सरपंच नलिनीताई थोरात यांनी सांगितले.

कालिकामाता यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे राजेंद्र भोसले, राजेंद्र धायबर, अनिता शेळके, सुहास काटे, स्वप्निल थोरात, गणेश थोरात, नाना थोरात विशाल शेळके, आनंदराव सोनावणे, जयेंद्र कुमार सोनवणे, दिगंबर बढे, पप्पू पवार, अनिल थोरात, राजू थोरात, यशवंत थोरात, किरण शेळके, अमोल धरणे, सागर तनपुरे, जय जवान ग्रुपच्या सदस्यांनी यांनी मोठी मेहनत घेतली होती. यावेळी ऍड सुभाष पवार उपस्थित होते.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…