शिरूर तालुका

सहा महिन्यांपासुन रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे शिरुरकर नागरीक हैराण

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरुर शहराला जोडला जाणारा शिरुर बायपास ते पाबळ फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुमारे सहा महिन्यांपासुन सुरु असुन या रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे शिरुरकर नागरीक हैराण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेला अंतर्गत भुयारी गटारीच्या कामामुळे सुरु असणारे काम आणी मध्यभागी टाकण्यात येत असलेले डिव्हायडर या मुळे शिरुरकरांना या रस्त्यावर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामामुळे अनेक वाहने घसरून वारंवार अपघात देखील झालेले पहावयास मिळत आहे.

दुसरीकडे नगरपरिषदेमध्ये प्रशासक असल्याने या निर्धास्त ठेकेदारांवर अंकुश नसल्याने अतीशय संथ गतीने काम सुरु असल्याचे दिसत आहे .शिरुर नगरपरिषदेने पाबळ फाटा चौक ते माजी वसुंधरा महामार्ग आणी कुमार प्लाऊड ते सर्टिफाइड हायस्कूल अशा तीन टप्प्यांत सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या डांबरीकरण व फुटपाथ चे काम टप्प्याटप्प्यावर ठेकेदार नेमुन दिले आहे परंतु सदर ठेकेदारांकडुन अतिशय संथ गतीने काम सुरु असुन हा रस्ता पुर्णपणे खिळखिळा झाला आहे.

यातच शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने सातत्याने वाहतूक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्त्याचे काम एकाचञ वेळी दुतर्फा सुरु असल्याने पडलेले खड्डे टाकलेला कच यातुन मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे टप्प्याटप्प्यावर काम करणे आवश्यक असताना एकाच वेळी रस्ता खोंदुन ठेवल्याने दोन्ही बाजूकडून वाहन चालवताना अनेक वेळा अपघात देखील होत आहे.त्यातच वयस्कर गृहस्थ महिला , आजारी नागरीकांना या रोजच्या अडचणी मुळे पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होत आहे. शिरुरचे मुख्याधिकारी आता सदर ठेकेदारांवर काही कारवाई करणार का हे पहावे लागेल .

तर शिरूरनगरपरिषद प्रशासनाला आयोडेक्स बाम भेट देणार …

सदर रस्त्याच्या दुरुस्ती चे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन शेकडो शिरुरकर या कामाला वैतागले आहे खरतर याबाबतीत मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना योग्य त्या सुचना दिल्या पाहीजेत पर्यायी कठोर कारवाई केली पाहीजे रोज या रस्त्यांवर जाणाऱ्या लोकांचे हाल लक्षात घेता या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला प्रतिकात्मक आयोडेक्स बाम देण्याचे आंदोलन करणार असल्याचे भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago