शिरूर तालुका

आरणगावात शिवजयंती उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राजगड किल्ल्याहून शिवज्योत आणत गावातील शिवज्योतीची मिरवणूक काढून शिवव्याख्याते सुनीता ठोबरे यांच्या सूश्राव्य व्याख्यानाने शिवजजयंती साजरी करण्यात आली आहे.

आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असताना सकाळच्या सुमारास किल्ले राजगड येथील शिवज्योत आणण्यात आली. शिवज्योत गावात येताच ढोल पथकाने शिवज्योतचे स्वागत करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

सदर शिवजयंती उत्साहात यशस्वी होण्यासाठी श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कोकाटे, उपाध्यक्ष श्रीनाथ जाधव, खजिनदार प्रथमेश कोकाटे, सचिव महेंद्र कोकाटे, विजय कोकाटे, सचिन कोकाटे, पोलीस पाटील संतोष लेंडे, उद्योजक दादा ओझरकर, खंडू भांड, दिपक नाचन, सिद्धार्थ वडघुले, नितीन जाधव, बापूराव कोकाटे, हनुमंत कोकाटे, सुनील मोरे, संतोष दगडे, राजू मखर, तानाजी कोकाटे, संतोष जाधव, माणिक जाधव, करण कोकाटे, सुभाष मोरे, संकेत कुलाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवव्याख्याते सुनीताताई ठोबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असता शिवव्याख्याते सुनीता ठोबरे यांनी युवकांना जीवनाची तत्वे सांगितली. यावेळी उद्योजक दादा ओझरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

11 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

12 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

6 दिवस ago