सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला.
तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे राबवून पक्षाचे काम अधिक मजबूत करणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी सांगितले.
तसेच शिवसेना पदाधिकारी राजाराम बानखेले, जयश्री पलांडे, अविनाश रहाणे, सुरेश भोर या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेना निष्ठा दौरा काढणार असून गावोगावी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आणि प्रत्येक गावात शिवसैनिक, युवा सैनिकांची फळी उभी आहे. ती अधिक मजबूत करणार असल्याचे उप जिल्हाप्रमुख रवी गायकवाड, तालुका संघटक समाधान डोके, उपतालुका प्रमुख नवनाथ पोखरकर, हनुमंत लघे, सुरेश फलके, नितीन दरेकर यांनी सांगितले.
प्रत्येक गावामध्ये शाखा आणि प्रत्येक घरात शिवसैनिक असा निर्धार करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपने उभे राहण्याची भूमिका सर्व शिवसैनिकांनी घेतली आहे. असे माजी तालुका प्रमुख दादासाहेब खर्डे तसेच सोपानराव जाधव यांनी सांगितले.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…