पोलिस कर्मचारी गजानन खत्री व पत्रकार अरुणकुमार मोटे यांच्यामुळे अखेर ‘त्या’ मयत व्यक्तीला मिळाला न्याय

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत १० मार्च २०२४ मध्ये ‘अज्ञात’ बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या व्यक्तीचा खुन झाला होता. परंतु या प्रकरणी वरीष्ठांनी मयताला कोणी वारस नसल्याने तपास न करता ‘आर्थिक तडजोड’ करुन प्रकरण दाबल्याची लेखी तक्रार पोलिस स्टेशनमधील ‘गजानन खत्री’ या पोलिस हवालदाराने पोलिस अधिक्षकांकडे केली होती. परंतु ‘खत्री’ यांच्या विषयी चुकीची माहिती पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आली होती त्यामुळे खत्री यांच्या पत्राला न्याय मिळत नव्हता.

 

त्यानंतर गोपनीय सुत्रांमार्फत माहीती मिळाल्याने ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे विशेष प्रतिनिधी तसेच पत्रकार अरुणकुमार मोटे यांनी घटनास्थळी भेट घेत सत्य माहीती जाणुन घेतली. सदरचा प्रकार खरा असल्याने लेखणीच्या माध्यमातून ‘निर्भिड व सडेतोडपणे’ आवाज उठवला. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाचे धाबे दणाणले.

 

त्यामुळे ‘गजानन खत्री’ यांच्या अर्ज चौकशीला वेग प्राप्त झाला व अखेर या लढयाला यश आले. शिक्रापुर पोलिसांनी तब्बल १० महीन्यांनी गुन्ह्याची उकल करत माधव दशरथ करडे (रा.सुंब,ता. बार्शी जि. सोलापुर, सध्या रा. सणसवाडी) या इसमाचा खुन झाल्याचे निष्पन्न करत एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा केला असुन चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले असल्याची माहीती शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे.

 

पण यातील एक आरोपी अजुनही फरार आहे. या गुन्हयाची उकल होणे कामी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले हे दोन दिवस शिक्रापुर पोलिस स्टेशनला ठाण मांडून होते. अखेर अज्ञात मयत व्यक्तीला न्याय मिळवुन देत खुनाला वाचा फोडल्याने ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे विशेष प्रतिनिधी आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा शिरुरचे तालुकाध्यक्ष अरुणकुमार मोटे तसेच कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी गजानन खत्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या पाठपुराव्यामुळे यापुर्वीही एका मयत व्यक्तीला मिळालाय न्याय…

कोरोनाच्या काळात शिरुर तालुक्यातील निर्वी या गावात एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या घटनेतही कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने सदर कार चालकावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यावेळेस ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने सडेतोड भुमिका घेत निर्भीडपणे वार्तांकन केले. त्यावेळी दौंड विभागाच्या तात्कालिन उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीची दखल घेत. शिरुरचे तात्कालिन पोलिस निरीक्षक यांना आदेश दिल्याने सदर कार चालकावर गुन्हा दाखल झाला होता.

 

पोलीस कर्मचारी गजानन खत्री व पत्रकार अरुणकुमार मोटे यांच्या धाडसी कामगिरीमुळे एका खुन झालेल्या व्यक्तीला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांचे शिरुर तालुक्यातील नागरीकांच्या वतीने खुप खुप आभार …

सिमा पवार

(सामाजिक कार्यकर्त्या) 

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने खुना ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?

शिक्रापुरच्या ‘त्या’ मयताचा खुन होण्यास अवैध धंदा कारणीभुत…?

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन त्या खुनाचा गुन्हा उघड

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

10 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

14 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

14 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

14 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

14 तास ago