आरोग्य

सांधेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेल’ गुणकारी

जस जसे तुम्ही उतारवयात येता, तशा शरीराच्या व्याधीही वाढतात. मात्र आजकाल सार्‍याच वयोगटात दिसणारा एक आजार म्हणजे ‘सांधेदुखी’. बरेच जण गुडघेदुखीचे प्रमाण प्रचंड स्वरुपात वाढले की उपायांसाठी धावाधाव करतात. त्यावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. मात्र नैसर्गिक उपायांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेलाचा’ वापर करा. ( केसांच्या समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेल कसे उपयोगी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का

एरंडेल तेल खरंच गुणकारी आहे का

गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण आहे. एरंडेल तेलातील वेदनाशामक गुण गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात. एंरडेल तेलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अ‍ॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेत एरंडेल तेल सतत झिरपल्याने स्नायूंना आलेली सूज व नसा मोकळ्या होतात.

गुडघेदुखीवर उपाय

झटपट आराम मिळवण्यासाठी, दुखणार्‍या गुडघ्यांवर गरम ऑलिव्ह ऑईलने मसाज करावा. तसेच गरम पाण्याचा शेक दिल्यानेही वेदना कमी होतात. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.

सांधिवातावर उपाय

रात्रभर एरंडेल तेलात भिजवलेला सुती रुमाल, गुडघ्यावर ठेवा. मात्र रुमालातील अतिरिक्त तेल पिळून काढा. त्यानंतर गरम पाण्याच्या पिवशीचा शेक देऊन तासभर रुमाल गुडघ्यांवरच ठेवा. दर 15 दिवसांनी हा उपाय करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago