शिरूर तालुका

हिवरे कुंभार मध्ये आढळला लोणीकंदच्या मुख्याध्यापकांचा मुतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका विहिरीमध्ये लोणीकंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील मुळचे रहिवाशी असलेले हनुमंत हरेल हे लोणीकंद येथील प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर असून पाच डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास हरेल हे अचानक शाळेतून गेले होते. त्यानंतर ते घरी देखील परतले नाही. त्यामुळे ते नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीसाठी गेले असावे असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले मात्र ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती. याबाबत तपास सुरु असताना 11 डिसेंबर रोजी हिवरे कुंभार येथे एम एच १२ एल जि ७१३७ हि दुचाकी शेतात उभी असल्याचे तसेच विहिरीमध्ये एका इसमाचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले.

याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता विहिरीमध्ये लोणीकंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत रामदास हरेल (वय ५3) रा. एकनाथ पठारे वस्ती चंदननगर पुणे मूळ रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत शशी हनुमंत हरेल (वय ३२) रा. एकनाथ पठारे वस्ती चंदननगर पुणे मूळ रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून हरेल यांची आत्महत्या कि हत्या याबाबत काहीही माहिती मिळू शकली नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

3 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

7 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

7 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

7 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

7 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

8 तास ago