विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात भगवी पताका घेत विद्यार्थी पालखी सहभागी
शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नोवेल प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका सह पालखी खांद्यावर घेत, टाळ मृदुंग वाजवत, फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केल्याने नोवेल प्राईडच्या मुलांचा पालखी सोहळा चांगलाच रंगल्याचे दिसून आले.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील नोवेल प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्यात प्राचार्यप्रियंका देशमुख, शाळेचे संस्थापक रघुनाथ गव्हाणे यांसह आदी शिक्षकांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात उपस्थित राहून टाळ व पताका घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह कर्मचारी हरिनामाच्या गजरात रंगून गेले त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील पालखी सोहळा अनुभवला. सदर पालखी सोहळ्यात काही ग्रामस्थ व पालक देखील सहभागी झाले होते, सदर अनोखा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…