शिरूर तालुका

सणसवाडीतून कंपनीच्या बांधकामाचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असेलल्या ठिकाणहून रात्रीच्या सुमारास चार अज्ञात युवकांनी काही मशिनरी व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ससवाडी (ता. शिरुर) येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असल्याने सदर ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले असल्याने २५ एप्रील रोजी रात्रीच्या सुमारास चार युवक सदर ठिकाणी असल्याचे सुरक्षा रक्षक ओम शिंदे व अनिल राठोड यांना दिसले त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या युवकांना आवाज दिला असता ते पळून जावू लागल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र चारही युवक अंधारात पळून गेले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी कंपनीतील सर्व साहित्यांची पाहणी केली असता बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचे केबल, मशीन असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत ओम मारुती शिंदे (वय १९) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

9 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago