शिरूर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत असलेले बी. बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.23) पहाटे दोन ते साडेतीनच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर शेजारील कपड्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील येमाई चौकाजवळ भोर बी. बियाणांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला.
दुकानातील बी बियाणे,रोख रक्कम सहा हजार रुपये चोरून नेले. तसेच चोरट्यांनी माघारी जाताना सीसीटीव्ही व डीव्हीआरसुद्धा घेऊन गेले आहेत. या घटनेत भोर यांचे रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुकानाच्या आजू बाजूने लावलेल्या काही कॅमेरांची देखील तोडफोड केली आहे.
भोर बी. बियाणांच्या दुकानाच्या शेजारीअसलेले शिवनेरी कलेक्शन कपड्याचे दुकान ही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी झाला. या परिसरात अनेक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून व्यवसाय करण्याच्या निमित्ताने फिरत आहेत. अशा लोकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान चौकशी करण्याची गरज आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आता गावागावात ग्रामसुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी नागरिकांकडून भावना व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी. व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी गस्त वाढवावेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण आपोआपच कमी होईल.
मनिषा भोर (सरपंच,कवठे येमाई, ता.शिरूर)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…