शिरूर तालुका

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात सोनंसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन पायी चालतअसणाऱ्या किंवा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या मुली व महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी करण्याचे प्रकार सध्या शिरुर शहरात वाढत चालले आहेत. (दि २६) जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणीसोबत पायी चाललेल्या एका महिलेचे मिनी मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने ओढुन चोरुन नेले आहे. याबाबत शितल विशाल झनकर (वय २७) या महिलेने शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) जानेवारी २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास शिरुर शहरातील जोशीवाडीच्या हद्दीत हनुमान मंदिर ते जुना महामार्गावर असलेल्या गणेश दुध डेअरीच्या समोरुन फिर्यादी तिच्या दोन मैत्रीणीसोबत पायी जात असताना दुचाकीवरुन दोन इसम आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने गळयातील मिनी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी करुन नेले आहे. त्यामुळे दोन अनोळखी व्यक्ती विरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

17 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago