शिरूर तालुका

वढू बुद्रुकमध्ये स्वामींच्या चर्म पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्म पादुकांवर अभिषेक केल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या असताना येथे दर्शनासाठी स्वामीभक्तांनी हजेरी लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे व नितीन भंडारे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन वस्तू व चर्म पादुका आलेल्या होत्या. यावेळी श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती. अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन जविनातील अनेक वस्तू स्वामी महाराजांचे शिष्य चोळप्पा यांच्या कुटुंबाकडे आजही असून त्या वस्तूंमधील मुळ चर्म पादुका श्रावण महिन्यात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जात असतात. गतवर्षी पासुन या मुळ चर्म पादुकांचे आगमन श्री छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथे होत आहे, या वर्षीही या पादुका सदर ठिकाणी आल्यानंतर स्वामी भक्तांनी मोठ्याप्रमाणात गर्दी करत स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

यावेळी सदगुरु मिलींददादा घाडगे यांच्यासह पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, चोळप्पा महाराजांचे सहावे वंशज निलेश नितीन पुजारी, वढु खुद्रचे माजी सरपंच माऊली चोंधे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच साहेबराव भंडारे, महादेव भंडारे, माजी चेअरमन शहाजी भंडारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भंडारे, उत्तम भंडारे, सोमनाथ भंडारे, अशोक भंडारे, संजय दरेकर, उमेश हरगुडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील भांडवलकर, अवधुत परीवाराचे सोमनाथ तरडे, अजित खैरे, राजेश जगताप, अमर गव्हाणे, प्रविण सुक्रे, अमोल उंद्रे, आदेश घावटे यांसह स्वामीभक्त व महिला मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या. सकाळी चर्म पादुकांवर मंत्रांच्या जयघोषात अभिषेक झाल्यानंत;र पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. यावेळी दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती, तर यावेळी आलेल्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago