शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे एका युवकाने घरातील तिसऱ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सदर युवकाने एक चिट्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

unique international school

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे राहणारा शुभम राऊत याने सायंकाळच्या सुमारास घरात कोणी नसताना घराच्या तिसऱ्या मजल्यावर जात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस नाईक तेजस रासकर, भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी धाव घेत पंचनामा केला असता त्यांना तेथे एक चिट्ठी व कंपनीबाबतचे काही कागदपत्रे मिळून आले. त्यावेळी येथील नागरिकांनी शुभमला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी शुभम ज्ञानेश्वर राऊत (वय २७) रा. आशीर्वाद कॉलनी करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यास मृत घोषित केले. मात्र शुभमने आत्म्हत्ये पूर्वी लिहून ठेवलेली चिट्ठी पोलिसांनी जप्त केली असून लवकरच आत्महत्येचे कारण समोर येणार आहे.

याबाबत दत्तात्रय रंगनाथ राऊत (वय ५४) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

10 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

10 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

10 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

11 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

11 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

11 तास ago