Categories: इतर

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना नक्की “कायद्याचा धाक” उरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असुन सध्या शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरटे रात्री ऐवजी दिवसाढवळ्या घरफोडी करु लागले असुन गेल्या काही दिवसांपासुन शिरुर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे पुढे येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे बिघडल्याचे चित्र दिसत आहे. नागरगाव (ता. शिरुर) येथे लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरात भर दुपारी लाखोंची चोरी करुन चोर पसार झाले आहेत.

याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवार (दि 4) रोजी दुपारी 12:30 ते 1:30 च्या सुमारास तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असुन शिरुर-चौफुला रोडवर नागरगाव हद्दीत असलेल्या एकनाथ नलगे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करत घरातील रोख रक्कम चोरुन नेली. तर संतोष नलगे यांच्या घरातून सोने- चांदीच्या मौल्यवान ऐवजाची चोरी केली असल्याने नागरगाव परिसरात चोरांनी दिवसाढवळ्या चोरी केल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

नागरगाव येथील नलगे कुटुंबीय हे लग्नानिमित्त जवळच असलेल्या मंगल कार्यालयात गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रस्त्यालगत असलेल्या तीन घरात भर दुपारी घरफोडी करत चोरी करत 5 तोळे सोन्याचे दागिने आणि दिड लाखांची रोख रक्कम असा 3 लाख 86 हजारांचा ऐवज चोरुन पोबारा केल्याची घटना घडली असुन याबाबत एकनाथ विष्णू नलगे (रा.नलगेवस्ती, नागरगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago