Categories: इतर

महिंद्रा येणार संभाजीनगरला! १५० एकर जागेची पाहणी

छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसी परिसरातील सुमारे १५० एकर जागेची नुकतीच पाहणी केली असून ही जागा कंपनीला पसंत पडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रा–जयपूर एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनाशी संबंधित मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून परिसर, पायाभूत सुविधा आणि उपलब्ध जमीन याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिसरात उद्योगांची मागणी झपाट्याने वाढत असून बिडकीन व शेंद्रा येथील Aurangabad Industrial City मध्ये अनेक मोठ्या कंपन्या दाखल झाल्या आहेत. Toyota आणि JSW Group सारख्या कंपन्यांच्या आगमनामुळे औद्योगिक भूखंडांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या भूखंडांची कमतरता निर्माण झाल्याने उद्योग विभागाने जयपूर एमआयडीसीचा पर्याय सुचवला असल्याची माहिती आहे.

महिंद्रा कंपनीला एकूण सुमारे ३०० एकर जागेची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी १५० एकर जमीन ऑरिक परिसरात आणि उर्वरित १५० एकर जमीन जयपूर एमआयडीसीमध्ये देण्याचे नियोजन असून दोन्ही ठिकाणी मिळून मोठा औद्योगिक क्लस्टर उभारण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि कंपनीदरम्यान लवकरच सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप एमआयडीसीकडे ५ टक्के रक्कम भरलेली नसली तरी कंपनीच्या पाहणीनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ऑटोमोबाईल आणि ancillary उद्योगांनाही मोठी चालना मिळू शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

6 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

6 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

11 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

15 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago