क्राईम

सणसवाडीच्या त्या कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मधून कंपनीच्या दोघा कामगारांनी कंपनीच्या शॉप मधील साहित्याची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रमोद विष्णू कांबळे व भरत बबन वाळूंज या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मध्ये काही कामगार काम करत असताना त्यांना कंपनीच्या शॉप मधील काही साहित्य जागेवर नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी कंपनी व्यवस्थापकांना माहिती दिली असता त्यांनी कंपनीतील CCTV तपासले असता त्यामध्ये कंपनी मधील प्रमोद कांबळे व भरत वाळूंज या दोघांनी सदर साहित्य चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत शिवाजी कडूबा धसाळ (वय ३७) रा. जे. डी. शुभारंभ सोसायटी वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रमोद विष्णू कांबळे रा. गणेशनगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे व भरत बबन वाळूंज रा. वाळद ता. खेड जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

11 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

15 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

15 तास ago