क्राईम

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.

राजेश भगवान पवार (वय 33 रा. बीड बायपास, एमआयटी कॉलेज जवळ, जि. छत्रपती संभाजीनगर) व अमित अरविंद देशमुख (रा. बीड बायपास, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी यांची सन 2016 मध्ये राजेश भगवान पवार याच्या सोबत ओळख झाली होती. त्याने फिर्यादीच्या मुलीला चित्रपटात भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते.

सदर चित्रपटाच्या शुटींगसाठी मार्च 2019 मध्ये ओतुर (जि. पुणे) येथे बोलविण्यात आले. फिर्यादी मुलीला घेऊन सदर ठिकाणी गेले. दरम्यान, पवार याने एकच दिवस शुटींग केल्यानंतर पुढील शुटींगसाठी फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. पवार याने फिर्यादी यांना खोटे बनावट तयार केलेले कागदपत्रे दाखवून वेळोवेळी रोख, चेक व फोन पे व्दारे 23 लाख रूपये घेतले. चित्रपटात कोणतीही भूमिका न देता फसवणूक केली.

दरम्यान, 23 लाख रूपयांच्या मोबदल्यात हॅरेअर कार देतो, असे सांगून पवार याने फिर्यादीला बुधवारी (ता. 1) नगर आरटीओ कार्यालयासमोर बोलून घेतले. फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी सदरचा प्रकार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती दिली. निरीक्षक यादव यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. कार देण्याच्या नावाखाली बोगस कागदपत्रांवर सह्या घेताना तोतया आरटीओ अधिकारी देशमुख व पवार यांना पोलिसांनी पकडले. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलिस गणेश धोत्रे, जवान योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, सुजय हिवाळे, अभय कदम, सलीम शेख, रियाझ इनामदार, संदीप थोरात, सोमनाथ राऊत यांनी केली.

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

19 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago