Shikrapur Police Station

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

क्राईम

शिक्रापूर (तेजस फडके): ‘मंत्रालयात माझे खूप मोठे संबंध असून, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी शेतकऱ्यांना धमकी देत पिकाचे नुकसान करत असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. परंतु, पोलिस शेतकऱ्यांऐवजी धमकी देणाऱ्यालाच मदत करत आहेत. पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे, तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी दादाभाऊ रामचंद्र पवार, नारायण रामचंद्र पवार, राजेंद्र शंकर पवार, शिवाजी विठ्ठल पवार यांनी याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पण, पोलिस आमची दखल न घेता महेश गोवर्धन याला अभय देत आहेत. महेश गोवर्धन याच्या धमकीमुळे आम्हाला आमच्या स्वःताच्या शेतामध्ये काम करणे आवघड झाले आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील गट क्रमांक. ४४८ व ४५० हे गट कुळ कायद्यानुसार आमचे वडील रामचंद्र मारुती पवार हे कुळ होते. संबंधित जागेबाबत शिरूर येथील न्यायालयात खटला सुरू आहे. संबंधित खटल्यातील महेश पुरुषोत्तम गोवर्धन ही व्यक्ती आम्हाला हातपाय तोडून नदीला फेकून देण्याची वारंवार धमकी देत आहे. तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही. माझी मंत्रालयात खूप मोठे संबंध आहे, असे सांगून पूर्ण गटावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. गट क्रमांक ४४८ मधील ५१.५० गुंठेवर महेश गोवर्धन व देखणे यांच्या वारसांची नोंद आहे. परंतु, गट क्रमांक ४४८ व गट क्रमांक ४५० या दोन्ही गटावर गोवर्धन अधिकार दाखवत आहे. सदर गटात महेश गोवर्धन, सुखदेव बाळा चव्हाण, बबन रंगनाथ चव्हाण व जयसिंग यशवंत चव्हाण हे चोरी करत असून, न्यायालयाचा अवमान करत आहेत. तरी संबंधितांवर कारवाई करावी.’

संबंधित शेतीमध्ये १९५० पासून आमची वहिवाट आहे. परंतु, महेश गोवर्धन याच्या धमकीमुळे आमचे कुटुंब दहशतीखाली वावरत आहे. गोवर्धन याच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे. संबंधित प्रकरण न्यायालयात असतानाही पोलिस आमच्यावरच दबाव टाकून आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी आम्हाला न्याय न मिळाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागणार आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

शिक्रापूर पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता संबंधित प्रकरण हे न्याय प्रविष्ठ असून, पोलिस यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर तालुक्यात सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान!

कानून के हाथ बहोत लंबे होते है…ना FIR ना पुरावा… तरीही रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!