मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांना वडापाव टपरीवर ८४ हजार रुपयांची पिशवी सापडली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली आणि काही वेळाने संबधित रकमेचे मालक कृष्णा भोगर हे आपल्या पैशांचा शोध घेत आले असता खात्री करून त्यांना ती रक्कम परत केली. माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे.

समाजात आजही चांगले लोक असून स्पाडलेले तब्बल चौऱ्यांशी हजार परत करत प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शन घडवत माणुसकी आजही जिवंत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले असून सोन पापडी विक्रेत्याच्या कष्टाचे पैसे त्याला परत करत करत एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

सोनपापडी विक्रेते कृष्णा भोगर हे वडापाव खाण्यासाठी पवार वडापावच्या गाडीवर थांबले व वडापाव खाऊन ते गडबडीत निघून गेले होते. काही वेळानंत तेथे कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद हे तेथे आले. त्यांना तब्बल ८४ हजार रुपयांची रक्कम असलेली पिशवी दिसली. याबाबत विचारपूस करता त्याबाबत कोणालाच काहीच सांगता येईना. तब्बल दोन तासांनी सदर मालक कृष्णा भोगर गडबडीत आले. पैशाच्या पिशविबाबत विचारणा करू लागले. त्यावर माजी सरपंच अमोल गव्हाणे व अध्यक्ष प्रदीप काशीद यांनी खात्री करत ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर ८४ हजार रुपयांची रक्कम मूळ मालकाला परत करताण्यात आली.

यावेळी राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशिद व सरपंच अमोल गव्हाणे, संतोष पवार, विकी गव्हाणे, ॠषी काशिद, संकेत शिंदे व शंभूराजे रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयकांत फडतरे उपस्थित होते.

याबाबत सदर कृष्णा भोगर यांनी कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे, राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांचे आभार मानत आजही प्रामाणिक माणसे असून माणुसकी जिवंत आहे हे पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याची प्रतिक्रिया दिली.

महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकली चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौल…

राजकारण! पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचाचे केले अपहरण; कारण…

सरपंचपद नडले! सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत सदस्याचा मृत्यू…

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

3 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

6 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

6 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

6 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

6 तास ago