औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे याचे खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील त्याच्या चुलत मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. सदरील मुलगी वडिलांच्या मोबाइलवरून विशालसोबत बोलत असे. तसेच चॅटिंग करीत असे. याची कुणकुण लागल्याने सदरील मुलीचा भाऊ आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवरुन सदरील मुलीच्या नावाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मेसेज पाठवून विशाल यास चिंचोली शिवारात बोलावून घेतले.
त्यामुळे विशाल हा 2 मित्रांसह चिंचोली शिवारात गेला असता आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने रागाच्या भरात काही कळण्याच्या आत त्याच्या जवळील लाकडी दांड्याने चुलत मावस भाऊ विशालच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार वार केला. तसेच विशालच्या दंडावर, खांद्यावर, मांडीवर जबर मारहाण केली.
सोबतच्या मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णा पवार याने त्यांना जुमानले नाही. दरम्यान लाकडी दांड्याचा खनाच्या भागाचा जोराचा फटका बसल्याने विशालच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली.
जखमी अवस्थेत त्यास त्याच्या घराजवळील मंदिराजवळ सोडण्यात आले. यानंतर विशाल घरी गेला व अंघोळीसाठी अंगावरील कपडे काढत असताना खाली कोसळला. त्यानंतर त्यास उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी मृत घोषित केले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…