क्राईम

कान्हूर मेसाईत महिलेच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कान्हूर डमेसाई (ता. शिरुर) येथील पुंडे मळा येथे राहणाऱ्या सुरेखा पुंडे या 4 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या होत्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास पुंडे या घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्थ झाल्याचे तसेच घरात दागिने व पैसे ठेवलेली पिशवी उघडून त्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत सुरेखा बाळू पुंडे (वय ४१) रा. पुंडे मळा कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago