shubhada patil and api rahul raut
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत दोघेही गडहिंग्लजमधून फरार झाले होते. शुभदा पाटील आणि राहुल राऊत याने संतोष शिंदे यांना एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देतानाच त्यांचा मुलगा अर्जुनशी सुद्धा गैरवर्तणूक केली होती. या दोघांसह पुण्यातील दोन जणांचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख करताना संतोष शिंदे यांनी या चौघांना आत्महत्येला दोषी धरावे, असे नमूद केले होते.
सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या शुभदा आणि राहुल याला कोल्हापूर पोलिसांच्या टीमने सोलापुरातून रविवारी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. ते सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यामधील विशाल बाणेकर आणि संतोष पाटे यांची नावेही सुसाईड नोटमध्ये आहेत. पुण्यातील दोघांची नावे आर्थिक व्यवहारातून लिहिली आहेत. त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी संतोष शिंदे यांच्या घरी रविवारी (25 जून) भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा शिंदे, बहीण प्रतिभा मांडेकर आणि नातलगांनी हंबरडा फोडला. संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी माझ्या नातवाचा दोष तरी काय? असे म्हणत आक्रोश केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झाले. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी हंबरडा फोडला. त्या रडतच सांगत होत्या, “माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेलं आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता,” असे म्हणताच मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झाले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …