nagpur police crime
नागपूर : एका पोलीस कर्मचाऱ्याने रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून आत्महत्या केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काशिनाथ कराडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे.
काशिनाथ कराडे हे सोमवारी (ता. २६) दुपारी पेन्शन नगर परिसरात काशिनाथ यांनी महावितरणच्या रोहित्राला (डीपी) स्पर्श करत आत्महत्या केली. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काशिनाथ कराडे मूळचे सातारा जिल्ह्याचे असून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांसह एका भाड्याच्या घरात राहात होते. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. काशिनाथ कराडे गेले काही दिवस तणावात होते. काल दुपारी ते घराबाहेर निघाले आणि घराजवळील महावितरणचे रोहित्र (लोखंडी बॉक्स) उघडून त्याला स्पर्श करत आत्महत्या केली.
काशिनाथ यांनी रोहित्राला स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि काही वेळ त्याला चिटकून राहिल्यानंतर काशिनाथ खाली कोसळले. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच धाव घेऊन लाकडी काठीच्या मदतीने काशिनाथ यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुपारी रागाच्या भरात काशिनाख डीपीजवळ पोहचले. त्यानंतर डीपीचा दरवाजा उघडला. त्यानंतर मोबाईलमध्ये मेसेज केला. त्यानंतर डीपीला स्पर्श केला. मात्र पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा डीपीला स्पर्श केला. दुसऱ्यांदा डीपीला स्पर्श केला. त्यानंतर जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र ताणतणावातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…