क्राईम

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड येथील माजी सरपंचाची साडूनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, मेहुणीसह बायकोवरही कुऱ्हाडीने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (ता. 16) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे. मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत मयताची मुलगी रोशनी राऊत हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ‘माझे काका संशयित आरोपी पळसण येथील भास्कर परशराम पवार यांचे कुटुंब नातेवाईक असल्याने आमच्याकडे राहत होते. त्यांना त्यांचा चुलता हिरामण पवार हा त्रास देत असल्याने ते मनोहर राऊत सहा महिन्यांपासून राहत होते. सहा सात महिने झाल्याने हातरुंडी येथील मामा प्रकाश महाले यांनी सांगितले की आता त्यांना मूळगावी पायरपाडा येथे पाठवून द्या. तोच निरोप मनोहर राऊत काका आणि मावशी यांना सांगितला, की तुम्ही आता तुमच्या गावी निघून जा, याचा राग भास्कर पवार यांना आला. तोच राग मनात धरुन पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भास्कर पवार याने मनोहर राऊत उजव्या खांद्याच्या मानेजवळ, हनुवटी आणि छातीवर वार केले. आई आणि मावशीच्या हातावर कुऱ्हाडीने वार करुन जखमी केले.’

दरम्यान, घटना घडत असताना भास्कर पवार यांचा मुलगाही धावत आला, त्याने संशयितास पकडून ठेवत कुऱ्हाड बाजूला फेकून दिली. घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना देण्यात आली, तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला. याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर हे पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. यापैकी मयत मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. राऊत यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago