क्राईम

शिरुरमध्ये गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह एकास अटक

शिरुर: पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे जिल्हयामध्ये गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत नुकतेच आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने शिरुर शहरातील सी टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको कॉलनी रोड येथे एकजण विनापरवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत शिरुर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करुन बेकायदेशीर पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या अरबाज रशीद खान (वय २३) रा. बाबुरावनगर, शिरुर यास अटक केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि. २६) रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि अरबाज रशीद खान हा सी टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको कॉलनी रोड इथं त्याच्या मित्रासोबत विनापरवाना गावठी पिस्तुल जवळ बाळगुन बेकायदेशीररीत्या फिरत आहे. हि माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीस पिस्तुलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस पथकातील एकनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नेमाने, तायडे, कॉ. साळुंके, चालक मांगडे यांना त्याठिकाणी तात्काळ पाठविले असता. अरबाज रशीद खान याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यावेळेस त्याची झडती घेतली असता त्याच्याकडुन ताब्यातुन २० हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल तसेच ४०० रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस असा एकुण २० हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नेमाने, तायडे, साळुंके, चालक मांगडे यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास एकनाथ पाटील करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

10 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago