क्राईम

शिरुर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई; 4 आरोपींना अटक

शिरुर (तेजस फडके): राजस्थान राज्यातून अहमदनगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या गुटख्यावर सापळा रचुन शिरुर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा वाहतुक करणाऱ्या प्रवासी लक्झरी बसससह 4 जणांना ताब्यात घेतले असून ६ लाख ३० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी प्रवासी वाहतुक करणाऱ्या लक्झरी बस मधुन राजस्थान मधून आलेला गुटखा अहमदनगर मार्गे पुण्यात नेण्यात येणार असल्याची बातमी खबऱ्या मार्फत शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाल करत त्या लक्झरी बसवर तात्काळ कारवाई करणेबाबत त्यांनी पोलीस पथकास पाचारण करत पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्हीजन इंटरनॅशनल, इंग्लिश स्कुल येथे सापळा रचुन अहमदनगर कडुन पुण्याला जाणारी ही लक्झरी बस हाताचा इशारा करुन थांबविली.

त्यानंतर बस चालक, सहचालक तसेच क्लिनर यांना खाली उतरवत बसची डिक्की उघडून तपासणी केली असता डिक्कीमध्ये एका पांढऱ्या रंगाचे गोणीत वेगवेगळया पाऊचमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आणि मानवी जिवीतास धोकादायक असलेला गुटखा मिळून आला त्यामुळे पोलिसांनी सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यामध्ये ३० हजार २५० रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा व व्ही १ कंपनीची सुगंधीत तंबाखु असा माल आणि गुटखा वाहतुक करणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स बस नं (एन एल 01 बी 2093) ची किंमत 6 लाख असा एकुण 6 लाख 30 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये १) सोहमलाल बौध्दराम गुर्जर (वय ४०) रा. त्रिलोकपुरा, सिकर, राजस्थान २ ) देवाराम भागुराम गुर्जर (वय ४२) ३) सुभाषचंद बन्सीधर गुर्जर (वय २८) रा. दतला, सिकर, राजस्थान ४ ) दिनेशकुमार मंगलारामजी मेघवाल (वय २१) रा. दौलतपुरा, जि.नागोर राजस्थान यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींना आज (दि 4) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना (दि. 6) ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घटट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस नाईक नितीन सुद्रिक, बाळासाहेब भवर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पालवे, राजाराम गायकवाड यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे हे करत आहेत.

यापुढे अशाच प्रकारे प्रवासी वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहनांचा वापर करून गुटखा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी गुटखा वाहतुक, विक्री, किंवा साठवणुक करु नये असे आवाहन शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

3 तास ago

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळणार मोठे बळ! एकाच वेळी १,४४० वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल;

मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…

3 तास ago

महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…

3 तास ago