सहा जण अटकेत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मलठण गावातील फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सापळा रचून जुगार खेळणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे रितसर फिर्याद संतोष सुभाष बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल, नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन यांनी दाखल केली असून आबा विठ्ठल शिंदे (वय ५०),लक्ष्मण सिताराम शिंदे (वय ३३),दादा रकमा कोळपे (वय ३८), सर्व रा. शिंदेवाडी, ता. शिरूर,अकबर अब्बास पटेल (वय ६४), रा. डोंगरगण, शिवाजी कृष्णा शेंडगे (वय ५०), रा. डोंगरगण, कारभारी मच्छिंद्र डांगे (वय ५४), रा. सोनेसांगवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपी फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत एकत्र जमून तीनपत्ती नावाचा जुगार खेळताना व पैशाची देवाणघेवाण करताना रंगेहाथ आढळून आले. या प्रकारामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बनकर हे करत आहे.
बेट भागातील पोलीस स्टेशनच्या या तत्पर कारवाईमुळे स्थानिक परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. बेट भागासह शिरूर तालुक्यातील अवैध जुगार व गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी शिरूर पोलीसांनी अजून ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…