क्राईम

शिरूर! दोन भावांच्या जमिनीतील १३०० डाळिंब झाडांची निर्दयी तोड; कोणी केली पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर) परिसरात दोन शेतकर्यांनी कष्टाचे पीक फुलत असताना मध्यरात्रीच्या अंधारात घडलेल्या अमानुष प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टात जमीन-वाटपाचा विषय प्रलंबित असतानाच सख्ख्या भावानेच दोन भावांच्या शेतातील तब्बल १३०० डाळिंब झाडे तोडून नासधूस केली आहे. संबंधित झाडे शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात या दोन भावांची असून, रात्रीच्या वेळी त्यांचा सख्खा भाऊ बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी झाडे तोडल्या ची लेखी तक्रार शिरूर पोलीस स्टेशन येथे केली आहे. या घटनेने शरदवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

शहाजी व दिलीप थोरात यांनी चार वर्षांपूर्वी भगवा जातीची १३०० रोपे सुमारे तीन एकर क्षेत्रावर लावली होती. लाखो रुपयांचा खर्च करून ही झाडे त्यांनी मनापासून वाढवली. सध्या या डाळिंब पिकाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली होती आणि पुढील दोन महिन्यांत काढणी अपेक्षित होती. परंतु शुक्रवारी मध्यरात्री शेतात घुसून सर्व १३०० झाडे मूळासकट तोडली, अशी धक्कादायक माहिती शेतकरी थोरात यांनी दिली. या तोडफोडीमुळे गत चार वर्षांचा परिश्रम, खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याचा पूर्णपणे विनाश झाला आहे. लागवड, सिंचन, खतांची गुंतवणूक, मजूर खर्च, औषध फवारणी ते निगा या सर्वांचा विचार करता शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठे भांडवल खर्च केले होते. या सर्वाची गणना करताना अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी शहाजी आणि दिलीप थोरात यांनी सांगितले.

सध्या शेतमालाला योग्य भाव नाही. कांदा, भाजीपाला यांचे दर कोसळलेले. अशातच एवढे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर जबरदस्त परिणाम झाला आहे. सदर शेतजमिनीचा वाटपाचा विषय कोर्टात प्रलंबित आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नसतानाही झाडे तोडून टाकणे हा न्याय व कायद्याचा अवमान ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी थेट आरोप केला आहे की, आमचा भाऊ “बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी मध्यरात्री येऊन झाडांची निर्दयीपणे तोडफोड केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जांबुत–शरदवाडी परिसरातील सर्व शेतकरी व नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की,दोषींवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्यावीअशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा उपाय करावेत. ही घटना केवळ दोन शेतकऱ्यांचे नुकसान नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस व महसूल विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकरी थोरात यांचा भावनिक उद्गार…
‘चार वर्षे आम्ही या झाडांना लेकरांसारखी वाढवले… आता फळधारणा झाली होती. तीन महिन्यात पीक हातात येणार होते. पण रात्रीच्यावेळी येऊन भावानेच निर्दयीपणे १३०० झाडे तोडली. आमचे चार वर्षांचे स्वप्न एका क्षणात संपले.”
– शहाजी व दिलीप थोरात

शिरूर तालुक्यात समाजकंटकाने शेतकऱ्यांची डाळिंबाची तब्बल १३०० झाडे तोडली…

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरूर तालुक्यात तब्बल ४० किलो वजनाचा व १५-२० फुटांचा अजगर; शेळी गिळली…

MIDC परिसरातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरणी शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

2 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

2 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

6 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

6 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

6 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

6 तास ago