Portrait of a leopard (Panthera pardus), Sabie-Sand nature reserve, South Africa?
पुणे : बिबट्यांचा मुक्त संचार थांबवण्यासाठी वन विभागाने एक अभिनव योजना आखली आहे. बिबट्यांसाठी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कृत्रिम जंगले तयार करण्यात येत आहेत. शिरूर तालुक्यात पिंपरखेड आणि न्हावरा येथे तसेच जुन्नर आणि मंचर येथे प्रत्येकी एक जंगल विकसित केले जाईल. या चारही ठिकाणच्या जागा निश्चित असून, प्रस्तावाला सरकारी मंजुरी मिळण्याची वन विभागाला प्रतीक्षा आहे.
उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले की, बिबटे खाद्याच्या कमतरतेमुळे बिथरले असल्याने ते मानवी वस्तीत प्रवेश करतात. त्यांना हा नवा अधिवास मिळाल्यास शहरांमधील त्यांचे प्रवेश कमी होतील. या प्रस्तावित जंगलांसाठी ३० ते ५० एकर क्षेत्राच्या वन विभागाच्या मोकळ्या जागा निवडण्यात आल्या आहेत. सध्या या जागा साधे कुरण किंवा विस्तीर्ण पठार स्वरूपात आहेत. जुन्नर, मंचर आणि शिरूर तालुक्यात पाण्याचे मुबलक साठे आणि उसाची शेती असल्याने या भागांत बिबट्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपरखेड, जांबूत या गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात तीन बळी गेल्यानंतर या जंगलनिर्मितीच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे.
या योजनेनुसार, सर्वप्रथम संपूर्ण जागा तारेचे कुंपण घालून पूर्णपणे बंदिस्त केली जाईल. त्यानंतर आतल्या परिसरात उत्तम दर्जाचे वेगाने वाढणारे गवत आणि वेगवेगळ्या देशी वृक्षांची मोठी रोपे लावली जातील. याचबरोबर वेली प्रजाती आणि दाट वृक्षराजीची लागवड करून नैसर्गिक पाणवठे तयार केले जातील. या कृत्रिम लागवडीची योग्य निगराणी केल्यास लवकरच त्यात नैसर्गिक वाढ होईल आणि कालांतराने साप, विंचू, ससे आणि पक्षी यांचाही नैसर्गिक अधिवास तिथे निर्माण होईल. जंगल तयार झाल्यावर, वन विभाग रेस्क्यू केलेल्या (पकडलेल्या) बिबट्यांना या नवीन बंदिस्त जंगलात सोडण्याचा विचार करत आहे, जेणेकरून त्यांना बाहेर न पडता नैसर्गिक खाद्य मिळेल आणि त्यांचा जीवनक्रम सुरक्षित राहील.
जुन्नरमधील माणिकडोह येथे सध्या ४५ बिबटे बंदिस्त संवर्धन केंद्रात आहेत, मात्र त्यापेक्षाही हे तयार जंगल बिबट्यांसाठी अधिक उपयुक्त आणि मानवी वस्तीसाठी सुरक्षित ठरेल, असा वन अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.
शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…
बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…