क्राईम

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत मल्हारी जाधव (वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव (रा. अण्णपूर, ता. शिरूर, ज. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, अन्नापूर येथील वसंत जाधव हे घरात असताना रात्रीच्या वेळी त्यांचा पुतण्या रामदास उर्फ मुसाभाई हा दरवाजाला लाथ मारून घरात आला. वसंत यांनी तू रात्रीचा घरात का आला असे म्हणत म्हणाले असता हे घर माझ्या नावावर करुन दे असे रामदास म्हणाला, त्यावेळी वसंत यांनी नकार दिला असता रामदास याने वसंत यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शेजारील भाऊ गिरे यांनी वसंत यांना मारहाणीतून सोडवले, याबाबत वसंत मल्हारी जाधव (वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव (रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

अण्णापूर गावात सन-२०१९/२०पासून ग्राम ठरावांसह गावातील अवैध दारु, ताडी आणी गुटखा बंदीसाठी शासनस्तरावर आमचे पत्रव्यवहार सुरु आहेत, परंतु ह्या धंद्यांबाबत “पोलिस/राज्य उत्पादन शुल्क/अन्न औषध प्रशासनाने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन गाव तसेच तालुकास्तरीय ह्या बाबींना पुर्णपणे लगाम लावणे आवश्यक आहे. अवैध दारू व संलग्न बाबींना ला पुर्णपणे आळा घालण्याबाबत शासनाने अनेक शासन निर्णय/शासन परिपत्रके आदेश निर्गमित केलेले आहेत. परंतु, दुर्दैवाने या आदेशांचे योग्य पालन होत नसल्यामुळे या अवैध व्यावसायिकांना आणि समाजकंटकांना कायद्याचे भय राहिले नाही. शासनाने निर्गमित केलेल्या शासन आदेशांनुसार “अवैध दारू धंद्यांबाबत पोलिस ठाण्याचे ठाणेदार व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक/उपनिरीक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल, तसेच तीन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या इसमानवर पोलिस अधिनियमाद्वारे हद्दपारची तसेच एमपीडीए ची कारवाई करण्याबाबतही शासनाच्या सूचना आहेत, ज्या हॉटेलमध्ये किंवा दुकानांमध्ये अवैधपणे दारू मध्ये विक्री होत असेल त्या गुत्ता मालकावरही गुन्हा नोंद करून संबंधित हाॅटेलचा परवाना कायमचा करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे, ढीगभर शासन आदेश आहेत. परंतू योग्य अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा काय उपयोग?
– निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते)

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

11 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

12 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

12 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

12 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

12 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago