Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील कथित टोळीप्रमुख योगेश केशव मचाले व त्याच्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अर्थात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाची आणि गुन्ह्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार २० मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावरील स्पर्धेच्या बॅनरवर सूत्रधार शिंदे यांचा फोटो न लावल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी योगेश मचाले व मिनीनाथ गव्हाणे यांच्या बोलावण्यावरून फिर्यादी मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले, त्यांचे मित्र ऋषिकेश सकुंडे आणि राहुल गिऱ्हे मैदानावर गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

तेथे अक्षय पाटील आणि पप्पू कड यांनी फिर्यादीसोबत वाद घालून त्यांच्याकडील पिस्तुलातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचा आरोप आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र मैदानावरून पळून जात असताना सूत्रधार शिंदे, रुतिक चव्हाण, योगेश मचाले, मिनीनाथ गव्हाणे, दिगंबर शेंडकर आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी दगडफेक करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

शिरूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात अक्षय ऊर्फ ईश्वर गोविंदा पाटील (रा. नानेकरवाडी, चाकण, मूळ रा. गोद्री, ता. जामनेर, जि. जळगाव) सूत्रधार लक्ष्मण शिंदे (रा. शिरसगाव काटा) आणि पप्पू ऊर्फ सत्यम दत्तात्रय कड (रा. बापदेववस्ती, कडाचीवाडी, चाकण) यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. रुतिक बाळू चव्हाण (रा. सादरलगाव) आणि दिगंबर दशरथ शेंडकर, (रा. चांबळी, ता. पुरंदर) हे जामिनावर आहेत. टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सात आरोपींविरुद्ध मूळ दोषारोपपत्र दाखल केले आहे. शिरूर पोलिसांच्या नोंदीनुसार, या टोळीविरुद्ध पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, चिथावणी देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शासकीय कामात अडथळा, खंडणी, दरोडा, बेकायदेशीर जमाव जमविणे आणि घातक हत्यारांनी दुखापत करणे अशा स्वरुपाचे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. टोळीची दहशत मोडून परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मोक्का कलमवाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तत्कालीन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सध्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलिस फौजदार महेश बनकर, रामदास बाबर, पोलिस हवालदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, पोलिस कॉन्स्टेबल सागर धुमाळ तसेच शिरूर पोलिस ठाण्याचे परसराम सांगळे, नितीन सुद्रीक, राहुल भवर, शरद वारे, नीरज पिसाळ आणि सचिन भोई यांनी केली.

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…